भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्यावर गुन्हा दाखल

1188

जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह इतरांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकऱ्यांचे संचारबंदी व जमावबंदीचे आदेश असतानाही कार्यालयाचे गेट अडवून पायऱ्यांवर फिजिकल डिस्टन्स न ठेवता बसून पोर्चमध्ये कापूस टाकण्यात आला. तसेच घोषणाबाजी करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे यासंदर्भात देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

screenshot_2020-06-05-16-59-44-546_com-google-android-gm

आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, रामराव वडकुते, भाजपचे शहराध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, बालाप्रसाद मुंदडा, रमेश दुधाटे, बाळासाहेब जाधव, सुरेश भूमरे व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या