खंडणी प्रकरणात आणखी एक गुन्हा; एजाज लकडावाला, सलीम महाराजसह तारिक परवीनला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी एजाज लकडावाला, सलीम महाराज आणि तारिक परवीन यांच्या विरोधात आज आणखी एका गुन्हा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेच तारिक परवीनला अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी एका बिल्डरला धमकावल्याप्रकरणी एजाज लकडावालाविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात एजाजसह सलीम आणि तारिक परवीनविरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावले होते. आज सकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने लगेच तारिक परवीन याला बेडय़ा ठोकल्या, तर एजाज आणि सलीम महाराज आधीच अटकेत आहेत.