
पूजा होळकर । मुबंई
मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील दोन ते तीन दुकानांना आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाण्याचे ६ घटनास्थळी पोहोचले. दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.
























































