
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत घाटकोपर स्थानकाच्या पूर्वेला गेस्टहाऊसजवळ एका दुकानाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे असलेल्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.





























































