अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणार जलद

बांधकाम सुरू असलेल्या त्या विभागातील अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. परंतु आता ऑनलाइन सेका पद्धतीने ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या कामात 1 ऑगस्टपासून बदल करण्यात आल्याने ना-हरकत (एनओसी) प्रमाणपत्र देण्याचे काम जलदगतीने होणार आहे.

मुंबईत इमारतींचे बांधकाम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या अग्निशमन दलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधितांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता ऑनलाइन पद्धतीत सुधारणा केली असून जलदगतीने ना-हरकत प्रमाणपत्र मिळवणे शक्य झाले आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर असे आता तीन विभाग करण्यात आलेले आहेत.