
सामना प्रतिनिधी । नगर
उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढत चालला आहे. आज सर्जेपुरा भागामध्ये रिक्षामध्ये गॅस भरत असताना दोन रिक्षांनी अचानक पेट घतला तर शिलाविहार येथे छोट्या टेम्पोला अचानक आग लागलण्याची घटना घडली आहे. महानगरपालिकच्या अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. यात कोणीतही जिवीतहानी झालेली नाही.
आज संध्याकाळच्या सुमाराला नगर शहरातील सर्जेपूरा भागातील अवैध्य रित्या गॅसचा व्यवसाय करणार्या एका ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या दोन रिक्षामध्ये गॅस भरण्याचे काम सुरु होते. सदरचा गॅस भरत असताना तो लीक होऊन अचाकनपणे दोन्ही रिक्षांनी पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर हे पथक घटनास्थही दाखल झाले व ही आग अटोक्यात आणली, या ठिकाणी नेमका कुणाचा व्यवसाय आहे याचा शोध सुरु केला आहे.
तर दुसरीकडे शिलाविहार परिसरात एका टेम्पोला आग लागली. आजुबाजूच्या नागरिकांना याची माहिती अग्निशमन दलाला दिलल्यानंतर पथक घटनास्थही दाखल झाले व ही आग अटोक्यात आणली.























































