‘अॅमेझॉन’ जंगलाला भीषण आग; हजारो एकरातील झाडं, प्राण्यांचा कोळसा

790
सर्व फोटो - रॉयटर्स

जैवविविधतेने नटलेल्या ब्राझिलमधील जगातील सर्वात मोठ्या ‘अॅमेझॉन’ जंगलाला भीषण आग लागली आहे. आग एवढी भयानक आहे की ब्राझिलमधील एक संपूर्ण शहर धुरामुळे अंधारात बुडाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले असून हजारो एकरावरील झाडं, गवत, प्राण्याचा कोसळा झाला आहे. ‘रॉऊटर्स’ने येथील फोटो प्रसिद्ध केले असून हे फोटो अंगावर काटा आणतात.

दक्षिण अमेरिकन देश ब्राझिलमधील साओ पाओलो शहराजवळ अॅमेझॉन जंगलामध्ये आग भडकली आहे. अॅमेझॉन आमि रोंडानिया राज्यात जंगलामध्ये लागलेल्या आगीने 2700 किलोमीटरचा परिसर व्यापला आहे. आगीमुळे धुराचे लोट उठले असून साओ पाओलो शहरामध्ये दिवसाही अंधारून आले आहे. दिवसाही लोकांना गाड्यांचे लाईट्स लावून चालावे लागत असून धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही अडचण होत आहे. गेल्या आठवड्यांपासून भडकलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

amozon1

आगीमुळे शेकडो एकरावरील जंगल भस्मसाद झाले असून जंगलातील प्राण्यांचा कोळसा झाला आहे. जळून कोळसा झालेल्या जनावरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगीमुळे अनेक जनावर गंभीर जखमीही झाले आहेत. या आगीकडे जगभरातील देशांनी लक्ष देण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत आहे. अन्यथा जैवविविधतेने नटलेले, दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचे भांडार असणाऱ्या अॅमेझॉनला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्विटरवर ट्रेंड
अॅमेझॉनच्या जंगलामध्ये गेल्या वर्षभरात हजारपेक्षा जास्त वेळा आग लागली आहे. परंतु यावेळी लागलेल्या आगीने भयानक रुप धारण केले आहे. सोशल मीडियावर याबाबत कॅम्पेन सुरू असून #PrayforAmazonas हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. नागरिकांसह सेलिब्रिटींनीही ब्राझिल सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे.

amozon2

का आहे हे जंगल खास?
अॅमेझॉनच्या जंगलाला जगाचे फुफूस म्हटले जाते. जगभरतील ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन या जंगलातून उत्सर्जित होते. तसेच येथे 16 हजार पेक्षा जास्त दुर्मिळ झाडं, वेलींच्या प्रजाती आढळतात. तसेच 25 लाखांपेक्षा जास्त दुर्मिळ प्राणी येथे आढळतात.

आपली प्रतिक्रिया द्या