बीडमध्ये वेअरहाऊसला भीषण आग; 75 कोटी रूपयाच्या गठाणी जळून खाक

fire-symbolic

बीड तालुक्यातील जप्ती पारगाव येथील राज वेअरहाऊस या कापसाच्या गठाणी ठेवलेल्या वेअरहाऊसला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान वेगाने वाढत गेलेली ही आग तब्बल पंधरा तास धुमसत होती. या आगीमध्ये अंदाजे 75 कोटी रूपयांच्या कापसाच्या गठाणीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

बंद असलेल्या वेअरहाऊसला आग लागलीच कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. जप्ती पारगाव येथे राज वेअरहाऊस असून मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास या वेअरहाऊसला भीषण आग लागली. या आगीत कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या. त्यामुळे वेअरहाऊसचे मोठे नुकसान झाले. या आगीत 75 कोटी रूपये किंमतीच्या गठाणी जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही आग तब्बल पंधरा तास धुमसत होती. घटनास्थळी परिसरातील शेतकरी, नागरिकांची गर्दी झाली होती. या आगीचे लोळ दूरपर्यंत पसरले होते. भीषण आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

आपली प्रतिक्रिया द्या