डासांना मारणाऱ्या मशीनमुळे लागली प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

डासांना मारण्यासाठी हल्ली सर्रास मॉस्किटो रेपलेंट मशीनचा वापर केला जातो. मात्र या मशीनमुळे छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आग लागली आहे. या आगीमुळे त्या अभिनेत्रीचा बेडरूम जळून खाक झाली आहे.

‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतील अभिनेत्री सौम्या टंडन हिच्या घराला डास मारणाऱ्या मशीनमुळे आग लागली होती. या आगीत सौम्याच्या घरातील बरेचसे सामान जळून राख झाले आहेत. सौम्याने स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ‘माझ्या घरी आग लागली होती. या दुर्घटनेमुळे मी ती गोष्टी शिकले. 1) कधी मच्छरचे मशीन सुरू ठेवून झोपायचे नाही. जेव्हा त्यातील औषध संपते ते स्विचला लावून तसेच ठेवू नये. 2) प्लगचे कनेक्शन व्यवस्थित लागलेले असावे 3)आग विझवणारी साधनं आपल्या घरात असायला हवी. ती विकत आणून घरी ठेवा व त्यांचा वापर कसा करायचा ते देखील शिका’ असे तिने ट्विटरवरून सांगितले आहे.