
हिंदुस्थानची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला शनिवारी सकाळी एका दुर्घटनेचा सामना करावा लागला. आयएनएस विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात उभी असताना शनिवारी सकाळी या युद्धनौकेत अचानक आग लागली.
काही वेळातच या आगीवर ताबा मिळवण्यात आला. नौदलाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, युद्धनौकेवरचे सर्व अधिकारी-कर्मचारी सुरक्षित आहेत. युद्धनौकेत आग कशी लागली? हे जाणून घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आयएनएस विक्रमादित्यवरील ही आग लहान होती. मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.
शनिवारी आयएनएस विक्रमादित्यवर आग लागल्याचे समजले. युद्धनौकेच्या एका भागातून धूर निघत असल्याचे डय़ुटीवर तैनात स्टाफच्या ध्यानात येताच त्यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या.
























































