अमेरिकेत ‘उल्कावर्षाव’! अवकाशात ‘अग्नीगोळा’ दिसल्याने नागरिकांमध्ये धास्ती

दक्षिण- पूर्व अमेरिकेत विशेष खगोलीय घटना दिसून आली आहे. या ठिकाणी लोकांनी अवकाशातून आगीचा गोळा म्हणजेच अग्नीगोळा पडताना पाहिला. यामुळे नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. अशा खगोलीय घटना उल्कापिंडातील उल्का कोसळल्यामुळे होतो. ही देखील तशीच घटना असावी असा अंदाज वर्तवला जात होता. जॉर्जियातील फोर्सिथ काउंटी आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या प्रवक्त्याने अमेरिकेत उल्का वर्षाव झाल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय हवामान विभागानेही याची पुष्टी केली आहे.

दक्षिण- पूर्व अमेरिकेत होणाऱ्या उल्का वर्षावाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा आगीचा गोळा खूप तेजस्वी होता. त्याची चमक काही तास दिसून येत होती. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

दक्षिण कॅरोलिनाच्या जंगलात पडला आगीचा गोळा

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दक्षिण कॅरोलिनाच्या जंगलात एक आगीचा गोळा पडताना दिसत आहे. कॅथरीन फॅर नावाच्या एका वापरकर्त्याने दुपारी साडे बारा वाजता दक्षिण कॅरोलिनाच्या अँडरसनकडे जात असताना हा आगीचा गोळा पाहिला. ती कारने प्रवास करत असल्यामुळे तिच्या कारच्या डॅशकॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झाला. आणि तिने तो शेअर केला आहे.

उल्कापिंड कसा तयार होतो
जेव्हा अंतराळातून एखादी उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. त्यावेळी घर्षण झाल्यामुळे त्याचे जळून अग्निगोलामध्ये रुपांतर होते. तेव्हा उल्कापिंड तयार होतो.