मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटात गोळीबार झाला आहे. त्यानंतर या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या गोळीबारात काही लोक जखमीही झाले आहेत.
मणिपूरच्या उखरूल भागात गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा नागा समाजाचे लोक एका ठिकाणी जमले. पण एका जमिनीवर स्वच्छता करण्याच्या वाद निर्माण झाला आणि दोन गटांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आसाम रायफलचे जवान घटनास्थळी पोहोचले. जमिनीच्या मालकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.