पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील ओमायक्रोनचा पहिला बळी

 ‘ओमायक्रोन’चा संसर्ग झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील एका 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण नायजेरियातून शहरात आला होता. वायसीएममध्ये रूबी एल केयर कॉर्डियक सेंटर येथे उपचार घेत असताना मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचे निधन झाले होते. आज त्यांचा ‘ओमायक्रोन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ‘ओमायक्रोन’चा देशातील पहिला बळी ठरला आहे.