हिंदुस्थानी लष्कराकडे पॉवरफुल आत्मघाती ड्रोन! 30 किलोमीटरची रेंज, दोन किलो दारूगोळय़ाची क्षमता, तासभर हवेत उडणार

हिंदुस्थानी लष्कराला स्वदेशी बनावटीचे पहिले मॅन पोर्टेबल आत्मघाती ड्रोन (सुसाईड ड्रोन) मिळाले आहे. आत्मघाती ड्रोनचा उपयोग शत्रूच्या प्रशिक्षण शिबिरांवर, तळांवर आणि लॉन्च पॅडवर हल्ला करण्यासाठी केला जाईल. जेणेकरून सैनिकांना होणारा धोका कमीत कमी होईल.

आत्मघाती ड्रोन सोलर इंडस्ट्रीजच्या नागपूरच्या इकॉनॉमिक्स एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड युनिटने बनवले आहेत. लष्कराने 480 लोइटरिंग म्युनिशन (आत्मघातकी ड्रोन) पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी 120 ची डिलिव्हरी झाली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यावश्यक खरेदी म्हणून या ड्रोनची ऑर्डर देण्यात आली होते. ती ऑर्डर वर्षभराच्या आत पूर्ण झाली आहे. पारंपरिक क्षेपणास्त्रs आणि शस्त्रास्त्रांपेक्षा पूर्ण वेगळे असे हे शस्त्र आहे, ज्याचा वापर सीमेवर घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी होऊ शकतो. विशेषकरून युव्रेन-रशिया आणि आर्मेनिया- अजरबैजान यांच्या संघर्षात सुसाईड ड्रोन वापरले गेले. या ड्रोन प्रणालीबाबत विदेशावर अवलंबून न राहता नागास्त्र- 1 मध्ये 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आलाय. हेरगिरी, पाळत ठेवणे, माहिती गोळा करणे, मदत-बचाव कार्ये आणि हल्ले थांबवण्यासाठी केला जाऊ शकतो.

नागास्त्र-1 कसे काम करेल

n नागास्त्र 1 लोइटरिंग म्युनिशन  ही एक हवाई शस्त्र प्रणाली आहे.  त्याला आत्मघाती ड्रोन म्हणजे सुसाईड ड्रोन असेही म्हणतात. हे ड्रोन हवेत लक्ष्याभोवती घिरटय़ा घालतात आणि हल्ला करतात.

n नागास्त्र-1 ड्रोनची रेंज 30 किमीपर्यंत आहे. त्याची प्रगत आवृत्ती दोन किलोपेक्षा जास्त दारूगोळा वाहून नेण्यास सक्षम आहे.

n जीपीएस तंत्रज्ञानाने परिपूर्ण असा हा ड्रोन दोन मीटरच्या अचूकतेसह सुमारे 30 किलोमीटरच्या रेंजपर्यंतचे लक्ष्य हेरू शकतो.

n आत्मघाती ड्रोन सायलेंट मोडमध्ये व 1,200 मीटर उंचीवर उडवले जाते, ज्यामुळे ते शोधणे कठीण होते.

n ड्रोन सुमारे 35 तास हवेत राहू शकतात. हे पूर्णपणे रिमोट कंट्रोल्ड आहेत.