अमरनाथ यात्रेचे 29 जूनला पहिले पूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथ यात्रा सुरू करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. यात्रा सुरू करण्याआधी 29 जूनला प्रथम पारंपरिक पूजन होईल. ही यात्रा 17 जुलैपासून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याची अधिकृत घोषणा जाहीर केली जाईल. यात्रा सुरक्षित बनवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा देण्याची योजना बनवली जात आहे. आरोग्य सेवा आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.