
जम्मू-कश्मीरच्या बारामुला जिह्यातील गुलमर्ग या परिसरात या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे या ठिकाणी जणू काही बर्फाची चादर पसरली होती. सगळीकडे पांढरेशुभ्र सोने अंथरले आहे, असे चित्र दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस अशीच बर्फवृष्टी कोसळण्याची शक्यता आहे. बर्फवृष्टी झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक यांच्यासह पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच स्थानिक दुकानदार, व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला आहे.






















































