मित्राला मारहाण केल्यामुळे दोन तरूणांवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी करणाऱ्या पाचजणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अमन चाँद शेख (वय 19) , साजीद चाँद शेख (वय 22), आकाश गोविंद शेंडगे (वय 21), प्रतीक विजय माने (वय 20 सर्व रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. संतोष गायकवाड आणि संतोष खेडकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
संतोष खेडकर आणि संतोष गायकवाड मित्र असून 28 जूनला रात्री सव्वा अकराच्या सुमारास हडपसरमधील रायकवर वस्तीवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पाच ते सहाजणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता. तरूणांवर वार करणारे हडपसर मांजरी परिसरात असल्याची माहिती अकबर शेख आणि शाहिद शेख यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून टोळक्याला ताब्यात घेतले.
चौकशीत संतोषचा मित्र गोट्याने आरोपींच्या मित्राला मारहाण केली होती. त्याचा राग आल्यामुळे संतोष खेडकर याला जीवे मारण्याच्या हेतूने वार केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, राजू अडागळे, एपीआय हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांनी केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास राउत करीत आहेत.




























































