गडचिरोलीत सीआरपीएफच्या पाच जवानांना कोरोनाची लागण, उपचार सुरू  

328

गडचिरोलीतील सीआरपीएफच्या पाच जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व जवानांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन 113 मधील 5 जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश-2, आंध्र प्रदेश-1, कुरखेडा-1, संभाजीनगर -1 येथील जवानांचा समावेश आहे.  यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 53 झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 62 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 116 झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या सर्व 61 रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यात 8 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या