पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच दिवसांच्या बाप्पांना काल शुक्रवारी ढोलताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत अत्यंत भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. सायंकाळपर्यंत एकूण 3971 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

दुपारपासून चौपाट्यांवर गणेशभक्तांनी गर्दी केली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने सर्व चौपाट्या आणि कृत्रिम विसर्जनस्थळे दणाणून गेली.  मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशे वाजत होते तसेच गणरायाचा जयघोष सुरू होता. मधूनच एखादी जोरदार पावसाची सर येत होती, तर अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. वाऱ्यासह पावसाचे तुषार अंगावर झेलत भक्तांनी अतिशय उत्साहात पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला. समुद्र, तलाव आणि कृत्रिम तलावांत बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पडले. विसर्जनस्थळांवर पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.

सार्वजनिक  23

घरगुती 3948

एकूण   3971

कृत्रिम तलावांत

सार्वजनि  9

घरगुती 849

एकूण   858