तूप रोटी खा.. निरोगी राहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तूप. आपल्या मराठी स्वयंपाकघरातील अत्यंत महत्वपूर्ण, राजस पदार्थ. तुपाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक डॉक्टर्स, तथाकथित आहारतज्ज्ञ वजन वाढेल म्हणून तूप आहारातून थेट बाद करायला सांगतात. पण खरे पाहता तुपाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आहारात दोन चमचे तुपाचा समावेश केला तर त्याचे अत्यंत आरोग्यदायी फायदे मिळतात.
१) तुपात ए, इ, क,आणि ड जीवनसत्व असते. ही जीवनसत्वे आपल्या आतड्याचे आरोग्य वाढवतात, तुपामुळे आतड्याला वंगण मिळते. त्यामुळे आतड्यांच्या हालचाली सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्टता जाते. सांध्यांना वंगण मिळते.
2) तुपामुळे कांती सुधारते. शरीरातून हानिकारक द्रव्ये काढून टाकली जातात. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
३) बाजारातील रिफाइंड तेलापेक्षा स्वयंपाकात तुपाचा वापर नेहमीच आरोग्यदायी ठरतो. तूप शरीराचे खराब कोलेस्टेरोल कमी करण्यास मदत करते आणि चागले कोलेस्टेरोल वाढवते.
४) सांधेदुखी, हाडांच्या समस्येवर आहारात रोज दोन चमचे तुपाचा समावेश करावा. विशेषत: खेळाडूंनी रोज दोन चमचे तूप खावे.
५) तुपात चरबी कमी असते. त्यामुळे त्याची वजन कमी होण्यास मदत होते. तुपातील अमिनो असिड्स पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.