
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात आत्महत्यांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. जिल्ह्यातील विविध भागात पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या सर्वांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एकाच वेळी पाच आत्महत्यांनी पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
या घटनेची माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले की, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये एक तरूण आणि तरूणीचाही समावेश आहे. ग्रेटर नोएडातील बीटा-2 पोलीस स्टेशन परिसरात 19 वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. धर्मेंद्र कुमार असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. एकाच दिवसात पाच जणांच्या आत्महत्येमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
आत्महत्येच्या इतर घटनांबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फेज-1 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. मुकेश असे मृताचे नाव आहे. तसेच नोएडातील सेक्टर-49 बरौल गावात राहणाऱ्या 21 वर्षीय अरमाताने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली. याशिवाय फेज-2 मध्ये राहणारा दीपक कुमार आणि नोएडा सेक्टर-126 येथील तरुणाने तणावामुळे पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. नोएडा सेक्टर-126 येथील मृत तरुणाचे नाव निखिल असे आहे. मानसिक तणावातून सर्वांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.