
अपघात हा जाणून बुजून होत नाही.. तो अचानकच होतो.. पण काही नियमांचे काटेकोर पालन केले तर अपघात टाळता येतो.
१) दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालावे, चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावावा.
2) वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा अधिक नकोच. लवकर निघा. सुरक्षित पोहोचा.
३) रात्रीचा प्रवास टाळा. पुरेशी झोप घ्या. तासनतास वाहन चालवू नका.
४) प्रत्येक तीन तासांनी थोडे थांबा. मन शांत ठेवा.
५) मद्यपान करून वाहन चालवू नका. मोबाईलवर बोलणे टाळा.





























































