
- उत्तर प्रदेशमध्ये पहिला टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 फेब्रुवारी, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 20 फेब्रुवारी, चौथ्या टप्प्यातील मतदान 23 फेब्रुवारी, पाचव्या टप्प्यातील मतदान 27 फेब्रुवारी, सहाव्या टप्प्यातील मतदान 3 मार्च आणि सातव्या टप्प्यातील मतदान 7 मार्चला पार पडेल.
- मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च असे दोन टप्प्यात मतदान पार पडेल.
- पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान
- पाच राज्यांमधील निवडणुका सात टप्प्यांमध्ये होणार.
View this post on Instagram
- पाचही राज्यात 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यास बंदी. त्यानंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल.
- रोड शो, रॅली, सायकल रॅली, बाईक रॅली, पदयात्रेवर निवडणुक आयोगाकडून बंदी.
- पाचही राज्यात कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली.
- कोविड प्रभावित किंवा संशयिताच्या घरी व्हिडीओ पथक जाऊन त्याला मत देण्याची संधी देईल
- 80 वर्षांवरील वृद्ध नागरीक, दिव्यांग आणि कोविड संक्रमित व्यक्तींसाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. या पाच राज्यांमध्ये विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल तारखांची घोषणा केली.
उत्तर प्रदेशमध्ये 403, पंजाबमध्ये 117, उत्तराखंड 70, गोवा 40 आणि 60 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पाचही राज्यातील एकूण 18.34 कोटी मतदार आगामी काळात आपला हक्क बजावताना दिसतील. यातील 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिली.
#WATCH Live: Election Commission of India announces Assembly polls schedule for Goa, Punjab, Manipur, Uttarakhand & Uttar Pradesh https://t.co/c9oDf6AdJd
— ANI (@ANI) January 8, 2022
यंदाच्या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विधानसभेतील किमान एक पोलिंग स्टेशनचे संचालन पूर्णपणे महिला करतील. पाच राज्यातील एकूण 1620 पोलिंग स्टेशनचे संचालन महिलांच्या हातात असेल. विशेष म्हणजे येथील सुरक्षेची जबाबदारी देखील महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. कोविडमुळे पाच राज्यांमध्ये गेल्या वेळेसच्या तुलनेत 16 टक्के मतदारकेंद्र वाढवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

























































