उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात खासकरून लहान मुले आजारी पडण्याचा धोका अधिक वाढतो. तीव्र सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि बदलत्या हवामानामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे लहान मुले आजारी पडण्याचा धोका देखील वाढतो. लहान मुले उष्णतेत शाळेत जातात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातील ऊर्जा झपाट्याने कमी होते. अनेकदा बहुतेक पालक घरी आल्यावर लहान मुलांना थंड पाणी किंवा इतर थंड पेय पिण्यासाठी देतात. हेच मुलांच्या  आजारी पडण्याचे एक प्रमुख कारण बनते.

अशा हवामानात लहान मुलांच्या आहारात काही बदल करून त्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली जाऊ शकते. या उन्हाळ्यात हे 5 सुपरफूड्स तुमच्या आहारात समावेश करू शकता आणि मुलांना निरोगी ठेवण्यास देखील मदत होईल.

उन्हाळ्यात मुलांच्या आहारात हे 5 सुपरफूड्स समाविष्ट करा

हिरव्या भाज्या

उन्हाळ्यात, तुम्ही मुलांच्या आहारात फायबर आणि व्हिटॅमिन सी असलेल्या हिरव्या भाज्या समाविष्ट करू शकता. मुलांना सहसा दुधी भोपळा, खायला आवडत नाहीत, म्हणून त्यांना दुधी भोपळा हलवा किंवा बर्फी बनवून खायला देऊ शकता.

टरबूज आणि खरबूज

मुलांच्या आहारात तुम्ही टरबूज आणि खरबूज यांचा समावेश करू शकता. त्यामध्ये भरपूर पाणी असते आणि ते डिहायड्रेशनपासून आराम देतात. याशिवाय, या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते जे मुलांची प्रतिकारशक्ती वाढवते.

 

लिंबू पाणी

 

उन्हाळ्यात, मुले अनेकदा थंड पिण्याचा आग्रह धरतात अशा परिस्थितीत, तुम्ही घरी आरोग्यदायी ड्रींक बनवू शकता आणि तुमच्या मुलांना देऊ शकता. ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि उन्हाळ्यात उष्माघाताचा धोकाही कमी होईल. उन्हाळ्यात तुम्ही मुलांना लिंबू पाणी देऊ शकता, त्यात व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात जे मुलांना हायड्रेटेड ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात.

 

नारळ पाणी

मुलांना डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी, तुम्ही त्यांना भरपूर पाणी द्यावे पण त्यासोबतच तुम्ही त्यांच्या आहारात नारळ पाणी देखील समाविष्ट करू शकता. त्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स यांसारखे पोषक घटक असतात जे डिहायड्रेशनपासून आराम देतात आणि मुलांना निरोगी ठेवतात.

 

आंबा पन्हं

मुलांच्या आहारात तुम्ही आंबा पन्हं देऊ शकता जे आरोग्यदायी आणि चविष्ट देखील आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि ए मुलांची पचनसंस्था निरोगी ठेवते आणि पोटालाही थंडावा देते.