दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, बंगळुरुतून पाच दहशतवाद्यांना अटक

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाच दहशतवाद्यांना केंद्रीय गुन्हे विभागाने अटक केली आहे. तसेच यांचा एक साथीदार जुनैद हा फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

सुहैल, ओमर, झाहीद, मुद्दसीर, फैजल अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. हे सर्व बंगळुरूचेच रहिवाशी असून हे सर्व तरुण 25 ते 35 वयोगटातील आहेत. याआधीही या पाच जणांना 2017 मध्ये एका खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी ते 18 महिने तुरुंगात होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांची सुटका झाली.

या पाच जणांकडून केंद्रीय गुन्हे विभागाने शस्त्र देखील जप्त केली आहेत. या सर्वांकडून बंदुका व कोयते जप्त करण्यात आले आहेत.