गोखले ब्रिजच्या कामासाठी पाच झाडांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरीमधील महत्त्वाच्या गोखले ब्रिजचे काम रखडले असताना आता या पुलाच्या कामात पाच झाडांचा बळी जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा पूल मे महिन्यात वाहतुकीसाठी सुरू होणार होता, मात्र पावसाळय़ाच्या तोंडावर झाडे हटवण्याचे काम सुरू होणार असल्याने ब्रिज पावसाळय़ानंतर तरी सुरू होणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.

अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा गोखले पुलाचा रेल्वे हद्दीमधील भाग धोकादायक झाल्याच्या तक्रारींमुळे पाडण्यात आला आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल बंद केल्याने अंधेरी परिसरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूककाsंडी होत आहे. त्यामुळे मे 2023 पर्यंत किमान एक लेन सुरू करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. मात्र रेल्वेकडून धोकादायक भाग पाडून त्याचा ताबा देण्यास उशीर झाल्याने पुलाचे पुढील काम लटकणार आहे.