
वाढवणा पासून जवळच असलेल्या हाळी येथील तेरु नदीला पहिल्यांदाच पूर आला परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तेरु नदीला पावसाळ्यातील पहिला पूर आल्याने तेरु मध्यम प्रकल्पात पाणी प्रचंड साठा झाला असल्याने 52 गावचा पाणी प्रश्न थोडा फ़ार मिटला असल्याने ग्रामस्थ आनंदीत दिसत होते.
बुधवारी साडे तीन वाजता परतीचा धुवांधार पाऊस बोरगाव, अजनसोडा, टाकळगाव, हाळी या नदी क्षेत्रात पडल्याने तेरु नदीला पावसाळ्यातील पहिला पूर आला. ही नदी तेरु मध्यम प्रकल्पात जाऊन मिळते या मुळे पूर आल्याने प्रकल्पात चांगलाच जलसाठा झाला.
अजून दोन दिवस असाच पाऊस झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने 52 गावातील नागरिक आनंदी झाल्याचे चित्र आहे. मात्र नक्कीच कमीत कमी 4 महिने पुरेल एवढा पाणी साठा जमला असल्याची चर्चा आहे.























































