
सामना ऑनलाईन | लंडन
रोल्स रॉयस या लंडनच्या सर्वात मोठ्या कंपनीने फर्नबोरोह एअरशोमध्ये पहिल्यांदा ‘फ्लाइंग टॅक्सी’ बनवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने एक इंजिन बनवल्याची माहिती दिली आहे. हे इंजिन उडत्या टॅक्सीसाठी प्रोपल्शन सिस्टम म्हणून काम करील. टॅक्सीत एकाचवेळी चार ते पाच प्रवासी बसू शकतील. इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ ऍण्ड लॅण्डिंग असे (इव्हीटीओएल) या प्रकल्पाचे नाव आहे. उडत्या टॅक्सीचा वेग ताशी ४०० किमी असेल. टॅक्सी ८०५ किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. टॅक्सी तयार करण्यासाठी रोल्स रॉयस कंपनीने इतर कंपन्यांचीही मदत घेतली आहे. येत्या पाच वर्षांत उडती टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत येईल.

























































