हवेत उडणारं हॉटेल बघा! कॉन्सेप्ट व्हिडिओ होतोय व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाशात उडणारं हॉटेल कधी पाहिलं का? नाही ना… पण विज्ञान तंत्रज्ञान ज्या प्रकारे प्रगती करत आहे, ते पाहिलं तर उडणारं हॉटेल ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. एका कॉन्सेप्ट व्हिडीओच्या माध्यमातून याची एक झलक सध्या दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

कॉन्सेप्ट व्हिडीओनुसार उडणारं हॉटेल एक प्रकारचे विमान असेल, जे कधीच जमिनीवर येणार नाही. त्यात पाच हजार प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असेल. या हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतील. हाशेम अल-घैली नावाच्या यूटय़ूब चॅनेलवर कॉन्सेप्ट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो बघून नेटिजन्स थक्क झाले आहेत. उडणाऱया हॉटेलमध्ये रेस्टॉरन्ट, शॉपिंग मॉल, जिम, थिएटर, स्विमिंग पूल कशा प्रकारे असेल, हे व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे.