
जीभ काळी पडण्याची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात, परंतु जीभ स्वच्छ असणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जर अचानक जीभ काळी पडली आहे असे वाटत असेल तर घाबरून जाऊ नका. सोप्या टिप्सचा वापर करून जिभेला स्वच्छ ठेऊ शकता. कोमट पाणी व थोडेसे मीठ घेऊन गुळणी केल्यास त्याचा फायदा मिळू शकतो.
अतिधूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनाने जिभेचा रंग बदलू शकतो, जीभ काळी पडू शकते. काही वेळा कॉफी आणि चहा जास्त प्यायल्यानेही जीभ काळी पडू शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. दररोज दोनदा जीभ स्वच्छ करा. आजाराचे लक्षण दिसल्यास डॉक्टरांना भेटा.