असं झालं तर… भाडेकरू घर सोडत नसेल तर…

मुंबई, पुण्यासारख्या शहरांत भाडय़ाने घर घेणे आणि देणे दोन्ही मोठे जिकिरीचे काम आहे. भाडय़ाने घर देताना काही घरमालक कायदेशीर बाबींचा विचार करत नाहीत.

त्यामुळे कालांतराने त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. घर भाडय़ाने देताना सर्व प्रक्रिया ही कायदेशीर करणे गरजेचे आहे. जर भाडेकरू घर सोडत नसेल तर.

सर्वात आधी भाडेकरूला जबरदस्तीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. उलट त्याला वकिलामार्फत घर सोडण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवा.

भाडेकरूने नोटीस मिळाल्यानंतरही घर सोडले नाही, तर न्यायालयात भाडेकरूच्या विरोधात बेदखल करण्यासाठी दावा दाखल करा.

घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील भाडे करार महत्त्वाचा आहे. करारामध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करणे दोघांसाठीही बंधनकारक असते.