
1 तुमच्याकडे जर कार किंवा बाईक असेल तर त्यासाठी आवश्यक असलेले आरसी बुक सांभाळून ठेवणे गरजेचे आहे, परंतु चुकून जर ते हरवले असेल तर काय कराल.
2 कार किंवा बाईकचे आरसी बुक हरवले असेल तर चिंता करण्याची गरज नाही. आरसी बुक म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डय़ुप्लिकेट काढता येऊ शकते.
3 आरसी बुक हरवल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आरसी बुक हरवल्याची तक्रार नोंदवा. तक्रारीच्या प्रतीसह पोलिसांकडून एक ‘आरसी लॉस्ट’ चालान मिळवा.
4 एमपरिवर्तन अॅपवर जाऊन ‘व्हर्च्युअल आरसी तयार करा’ हा पर्याय निवडा. डिजीलॉकरच्या खात्यात साईन इन करून ‘नोंदणी प्रमाणपत्र’ शोधा.
5 आरटीओच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. फॉर्म 26 डाऊनलोड करा आणि आवश्यक कागदपत्रांसह आरटीओमध्ये जमा करा. तेथून तुम्हाला आरसी बुक मिळेल.




























































