केस डायशिवाय काळे ठेवायचेत? मग हे सोपे उपाय करायलाच पाहिजेत

केस पांढरे होऊ नये याची काळजी प्रत्येकाला सतावत असते. मात्र केस पांढरे होऊ नये म्हणून आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. पुढील गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.

हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटामिन बी-६ चा समावेश झाल्यास केस पांढरे होत नाहीत. व्हिटामिन बी-१२ रक्ताच्या पेशी निर्माण करतात, यामुळे शरीरातील ऑक्सिजन डोक्यापर्यंत जाण्यास मदत होते.

vegetables

कढीपत्ता खाल्ल्याने देखील केस काळे राखण्यास होण्यास मदत होते. कढीपत्ता केसांची मूळं मजबूत करतो. तसेच कढीपत्ता नारळाच्या तेलात उकळून लावल्यास केसांची मूळं मजबूत होतात.

hair-tips

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन- सी असतं, ते कोलेजन तयार करतं. कोलेजन वाढत्या वयात केस पांढरे होण्यापासून वाचवतं.

strawberry from kalvan in gujarat

आयोडीनयुक्त मिठाचा आहारात समावेश करा. मात्र आहारात मिठाचं प्रमाण मर्यादेत ठेवा.

salt1

बदामात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन-ई असतं, सकाळच्या नाश्त्यात बदाम खा, केस पांढरे होण्यापासून बचाव होऊ शकतो.

badam_almond_

दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटामिन-बी मोठ्या प्रमाणात असतं, व्हिटामिन-बी ६ आणि बी-१२ लाल रक्तपेशींमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतं.

milk-or-curd

आवळ्यामुळे केसांना मोठ्या प्रमाणावर उपयुक्त टॉनिक मिळतं. केसांचे काळेपण राखण्यासाठी आवळा रामबाण उपाय आहे.

amla-1

आपली प्रतिक्रिया द्या