
चेंबूर आणिक गाव म्युनिसिपल शाळेत सहावी आणि सातवीच्या सोळा विद्यार्थ्यांना आज माध्यान्य भोजनातून विषबाधा झाल्याची घटना घडली. दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास माध्यान्य भोजन घेतल्यानंतर मुलांना अचानक मळमळ, उलटी आणि पोटदुखी झाली. या विद्यार्थ्यांना तातडीने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व मुलांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
चेंबूरच्या आणिक गाव येथे ही पालिकेची मराठी आणि हिंदी माध्यमाची आठवीपर्यंत शाळा आहे. या ठिकाणी सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना दररोजप्रमाणे आज दुपारच्या सुमारास भात, आमटी आणि पौष्टिक पदार्थ सर्व 240 विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देण्यात आले. यामध्ये हिंदी माध्यमाच्या सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असली तरीही 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती शताब्दीचे अधिष्ठाता डॉ. सुनील पकाळे यांनी दिली. दरम्यान, शाळांना आहार पुरकणाऱया शांताई महिला संस्थेला कामकाज थांबकिण्याचे आदेश देण्यात आले असून सदर शाळांमध्ये पर्यायी संस्थांना आहार पुरकठय़ाचे आदेश देण्यात आलेले आहेत.
शिवसेना मदतीला धावली
महापालिकेच्या एम/पूर्व प्रभाग क्र. 148 मध्ये झालेल्या या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. आवश्यक कार्यवाही करून रुग्णालयात जात विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून विद्यार्थ्यांना धीर देण्यात आला. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, माजी नगरसेविका निधी शिंदे, अंजली नाईक, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, शाखाप्रमुख विजय नागावकर, उमेश करकेरा, अविनाश शेवाळे उपस्थित होते. विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा तपास करून मुलांच्या प्रकृतीबाबत खबरदारी घेण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचे प्रमोद शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, सहावीच्या तुकडीसाठी शिक्षकच नसल्याने या विद्यार्थ्यांना सातवीच्या विद्यार्थ्यांसोबत बसवल्याचे समोर आले आहे.






























































