
नगर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा झाली. चिचोंडी पाटील येथे आपल्या कुटुंबासमवेत राहणारे संभाजी ठोंबरे त्यांची पत्नी शुभांगी आणि साडेतीन वर्षांचा मुलगा सम्राट यांना गुरुवारी रात्री जेवणानंतर त्रास व्हायला लागला. जेवल्यानंतर तिघांना जेवणानंतर उलटी झाली आणि मळमळ होऊ लागली. ही माहिती कळाल्यानंतर सीताराम शेळके यांनी या तिघांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. तिथे त्यांची प्रकृती खालावल्याने तिघांना पुढील उपचारासाठी नगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या विषबाधेमुळे सम्राट ठोंबरे याचा मृत्यू झाला. नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



























































