निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या 10,500 बसेस

307

राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागांत एसटी महामंडळाच्या 10,500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. त्यामुळे उद्या एसटीच्या राज्यभरातील विविध मार्गांवरील सुमारे 18 हजार दैनंदिन फेऱयांपैकी पाच हजार फेऱया अंशतः अथवा पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या होणाऱया संभाव्य गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

तरीही उद्या, 21 ऑक्टोबरला मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्याचा फारसा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होणार नसून आवश्यक त्या मार्गांवर बसेस सोडण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ज्या मार्गांवर दिवसभरात जास्त फेऱया आहेत अशा मार्गांवरील फेऱया कमी करून एखाददुसरी फेरी असणाऱया मार्गावर सोडण्यात याव्यात. तसेच कोणत्याही मार्गावरील अत्यावश्यक फेऱया बंद न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाकडून दिले आहेत जेणेकरून दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने प्रवाशांची गैरसोय होणार नाही. तरीदेखील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एसटी बसेस निवडणूक कामकाजासाठी गेल्यामुळे दैनंदिन वाहतुकीवर अंशतः परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांच्या होणाऱया गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या