Rice Water Benefits- चमकदार त्वचेसाठी, घनदाट केसांसाठी गरजेचे आहे फक्त तांदळाचे पाणी, वाचा

दक्षिण आशियाई देशांमध्ये, त्वचेला निरोगी बनवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. तांदळाचे पाणी मुरुमांपासून ते त्वचेवरील पुरळांपर्यंत आणि निरोगी केसांसाठी देखील वापरले जाऊ शकते. सौंदर्य वाढवण्यासाठी तांदळाचे पाणी कसे वापरता येईल ते जाणून घेऊया.

तांदळाच्या पाण्याचे फायदे: त्वचेच्या काळजीसाठी नैसर्गिक उपाय सर्वात फायदेशीर ठरतात. तांदूळ ही एक अशी नैसर्गिक गोष्ट आहे जी आपल्या त्वचेला अनेक प्रकारे पोषण देऊ शकते. याशिवाय, त्वचेच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. अनेकजण भात शिजवताना तांदळाचे पाणी फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का की, तचे पाणी हे पोषक तत्वांनी समृद्ध असते. केवळ आरोग्यासाठी नाही तर हे पाणी त्वचेसाठी आणि केसांसाठी उत्तम मानले जाते.

पौष्टिक पॅक: तांदळाच्या कांजीमध्ये मध आणि दूध मिसळा. त्यामध्ये शिजवलेला भात गरजेनुसार मॅश करा आणि त्यात मिसळा. सर्वकाही मिसळा आणि पेस्ट बनवा. हा पॅक चेहरा, हात आणि शरीराच्या उघड्या भागांवर लावा. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.

त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स
स्क्रब: दही तांदूळ आणि साखरेच्या मिश्रणात मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि शरीरावर लावा. अर्ध्या तासानंतर ते स्वच्छ करा.

अँटी-एजिंग-
तांदळाचे पाणी त्वचा तरुण दिसण्यासाठी सुद्धा वापरले जाऊ शकते. तांदळाचे पाणी त्वचेवर लावल्याने, त्वचेला तजेला येतो आणि तरुण दिसू लागतो. यासाठी कापसाच्या मदतीने तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावा.

त्वचा आणि केसांसाठी वापरा तांदळाचे पाणी, आश्चर्यकारक फायदे जाणून व्हाल अवाक