
कर्नाटकातील हुबळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दलित मुलाशी लग्न केल्याने एका वडिलांनी आपल्या 20 वर्षांच्या गर्भवती मुलीची हत्या केली. लग्नापासून मुलगी तिच्या कुटुंबापासून वेगळी राहत होती. मात्र, सात महिन्यांनंतर ती तिच्या गावी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिची निर्घृण हत्या केली.या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
मान्या पाटील असे तरुणीचे नाव होते. सात महिन्यांपूर्वी तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध एका दलित तरुणाशी तिने लग्न केले. कुटुंबियांच्या भितीने मान्या तिच्या पतीसोबत हुबळीतील तिच्या गावापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या हावेरी जिल्ह्यात राहायची. मान्याच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. त्यांनी या जोडप्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लग्नाच्या सात महिन्यांनंतर,जेव्हा हे जोडपे मुलाच्या घरी परतल्याची माहिती मुलीच्या कुटुंबाला लागली. वडिलांनी 21डिसेंबर, रविवार रोजी मुलगा आणि त्याच्या वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शेतात लपले आणि हल्ल्यातून बचावले.रविवारी संध्याकाळीसहा साडेसहाच्या सुमारास, काही लोकांनी तिच्या सासरच्या घरी जाऊन मुलीवर लोखंडी पाईपने हल्ला केला. सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या मान्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना तिचे सासरेही गंभीर जखमी झाले.
मान्याला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले.या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.






















































