फोर्ब्सची‘अमेरिका ग्रेटेस्ट इनोवेटर्स’ यादी जाहीर; मस्कच! जेफ बेजोस, बिल गेट्सपेक्षा ठरले वरचढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला पंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखला आहे. जगातील प्रतिष्ठत मॅग्जिन फोर्ब्सने ‘अमेरिका ग्रेटेस्ट इनोवेटर्स’ यादी जाहीर केली आहे. या यादीत इलॉन मस्क यांनी जगातील दिग्गजांना पछाडून नंबर वन स्थान पटकावले आहे. मस्क हे धाडसी निर्णय घेणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी टेस्ला, स्पेसएक्स, न्यूरोलिंक, एक्सएआय यासारख्या पंपन्या बनवून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळेच फोर्ब्सने त्यांना अव्वल स्थान दिले आहे.

या यादीत मस्क यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि एनविडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांना मागे टाकले आहे. ही यादी टेक्नोलॉजी, मीडिया, वेंचर पॅपिटल आणि मॅन्युफॅक्चरिंग संबंधित आहे.

फोर्ब्सने म्हटले की, मस्क हे इतिहासातील पहिली अशी व्यक्ती आहेत की, ज्यांनी टेस्ला, स्पेसएक्स, न्यूरोलिंक, एक्सएआय आणि द बोरिंग कंपन्या बनवल्या आहेत. तसेच या पंपन्या जागतिक स्तरांवर पुढे नेल्या आहेत. आज या कंपन्यांची किंमत अब्जावधी रुपयांमध्ये पोहोचली आहे. या सर्व कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत आहेत.

फोर्ब्सने जाहीर केलेल्या या यादीत दुसऱ्या स्थानावर जेफ बेजोस, तिसऱ्या स्थानावर बिल गेट्स, चौथ्या स्थानावर जॉर्ज लुकास, पाचव्या स्थानावर जेन्सन हुआंग आहे. या सर्व दिग्गजांनी आपापल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन सहाव्या स्थानावर, निकेचे सहसंस्थापक फिल नाईट सातव्या स्थानावर, मार्टिन रोथब्लैट आठव्या, टेड टर्नर नवव्या, तर विनोद खोसला हे दहाव्या स्थानावर आहेत