मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 9.32 लाख कोटी रुपयांसह ते अव्वल स्थानावर आहेत, अशी माहिती फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2025 मधून उघड झाली आहे. फोर्ब्सने नुकतीच ही यादी जाहीर केली असून या यादीनुसार देशातील सर्वात 100 श्रीमंत व्यक्तींची एकूण संपत्ती 88 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, परंतु या 100 व्यक्तींच्या संपत्तीत 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी या सर्व उद्योगपतींची संपत्ती 1.1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 97 लाख कोटी रुपयांवर होती. 100 श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीत 100 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे हे नुकसान त्यांना सोसावे लागले आहे, असे दिसत आहे.

कोण किती श्रीमंत

n हल्दीराम स्नॅक्स फूडचे किशन अग्रवाल, मनोहर अग्रवाल आणि मधुसूदन अग्रवाल हे 9 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 80 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह 28 व्या स्थानावर आहेत.

n वारी एनर्जी चालवणारे दोशी भावंडे या वर्षीच्या यादीत 37 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 7.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 67 हजार कोटी रुपये इतकी आहे.

n इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीजचे संस्थापक सुनील वाचानी 80 व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 3.85 अब्ज डॉलर्स आहे.

n केपीआर मिल्सचे के.पी. रामास्वामी हे 29 हजार कोटींच्या निव्वळ संपत्तीसह 97 व्या क्रमांकावर आहेत.

टॉप 10 श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानी 105 बिलियन डॉलर
गौतम अदानी 92 बिलियन डॉलर
सावित्री जिंदाल 40.2 बिलियन डॉलर
सुनील मित्तल 34.2 बिलियन डॉलर
शिव नाडर 33.2 बिलियन डॉलर
राधाकृष्णन दमानी 28.2 बिलियन डॉलर
दिलीप सिंघवी 26.2 बिलियन डॉलर
बजाज कुटुंब 21.8 बिलियन डॉलर
सायरस पुनावाला 21.4 बिलियन डॉलर
कुमार बिर्ला 20.7 बिलियन डॉलर