
मे महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 18,620 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान तणाव असूनही, एफआयआय हिंदुस्थानी बाजारात सतत खरेदी करत आहेत. तज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे बाजारपेठेतील अनिश्चितता, जागतिक मंदी, शेअर्सचे उच्च मूल्यांकन आणि कॉर्पोरेट उत्पन्नातील वाढीच्या चिंतेमुळे एफआयआय सतत पैसे काढत होते. एप्रिलच्या सुरुवातीला, 2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी पहिल्यांदाच 4,223 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. तर वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत, एफआयआयनी 1.4 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.