भोवडे येथे जंगलातील पडिक गोठयात कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या

संगमेश्वर तालुक्यातील भोवडे येथील जंगलात असलेल्या विनायक बोबडे यांच्या पडिक गोठ्यात कुजलेल्या अवस्थेत नर जातीचा बिबट्या सापडला आहे. भोवडे रवंदेवाडीतील ग्रामस्थ गुरे चरण्यासाठी जंगलात गेले असता हा प्रकार निदर्शनास आला. पोलीस पाटील प्रदीप अडबल यांनी वनविभागाशी संपर्क साधला असता वन अधिकारी मुल्ला, पशुवैद्यकीय अधिकारी कदम पोलीस पाटील प्रदीप अडबल यांनी पंचनामा करून बिबट्यास अग्नी देऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे पोलीस पाटील प्रदीप अडबल यांनी सांगितले, मात्र या बिबट्याचा मृत्यू सात ते आठ दिवसांपूर्वी झाल्याचा निष्कर्ष वन अधिकाऱ्यांनी काढला आहे.