गंगाखेडमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे रचला सापळा

475

गंगाखेड तालुक्यातील खळी शिवारामध्ये गोदाकाठी उसामध्ये शेतकर्‍याला बिबट्या दिसल्याने वन विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या 23 मे रोजी दिसला. आता बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा रचला असून आतापर्यंत बिबट्या वनविभागाच्या हाती लागला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गंगाखेड तालुक्यातील खळी शिवारामध्ये एका शेतकऱ्याच्या कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याने त्याला फस्त केले होते. त्यामुळे शेतकऱ्याने कुत्र्याचा शोध घेतला असता उसाच्या शेतात त्याला बिबट्या दिसला. गंगाखेडच्या तहसीलदारांना दूरध्वनीद्वारे शेतकऱ्यानी बिबट्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाला याठिकाणी पाठवण्यात आले होते. बिबट्याच्या पायाचे ठसे विभागाने घेऊन या ठिकाणी कुत्र्यावर हल्ला झालेल्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेर्‍यामध्ये 23 मे रोजी बिबट्याचे दर्शन झाले. आता बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा रचला असून आतापर्यंत बिबट्या वनविभागाच्या हाती सापडलेला नाही. वन विभागाचे पथक रात्रंदिवस बिबट्याला पकडण्यासाठी मेहनत घेत आहे. बिबट्याच्या वावराने या विभागांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या