
नेवासा तालुक्यात आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विविध विकासकामे व सर्व सामान्य जनतेसाठी सदैव उभे राहून मदत करण्याची भूमिका यामुळे त्यांचे पाठबळ वाढत आहे. संकट काळात सर्वांसाठी सहकार्याची भूमिका घेत असल्यानेयामुळे शंकरराव गडाख गटात देडगाव येथील निवृत्ती मुंगसे, बन्सी चेमटे, दादासाहेब घोडके, बारकु पळसकर, आण्णा फुलारी,बाप्पुराव मुंगसे,देवराव मुंगसे, लक्ष्मण कदम, आदिनाथ आठरे व परिसरातील कार्यकर्त्यांनी गडाख गटात प्रवेश केला.
यावेळी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे शंकरराव गडाख यांनी सांगितले. देडगाव व परिसरातील जनतेचे सार्वजनिक कामे असतील तर ती निश्चितपणे सांगा, त्या सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू. एकोप्याने गाव व परिसराचा विकास साधू माजी आमदार मुरकुटे यांनी फक्त भूलथापा दिल्या कामाच्या बाबतीत कुठलेही सहकार्य झाले नाही. त्यामुळे विकासकामांसाठी प्रयत्नशील राहणाऱ्या शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटात प्रवेश केला असून यापुढे गडाख यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे निवृत्ती मुंगसे म्हणाले

























































