
सामना प्रतिनिधी, जामखेड
पेट्रोल पंपावर डिझेलचे पैसे मागितल्याने बंदूकीचा धाक दाखवून कर्मचार्यास मारहाण केली. या नंतर याच आरोपींनी शहरातील एका लाँड्री दुकानाची मोडतोड करत दुकानदारास मारहाण केली याप्रकरणी आर्म अॅक्ट व दरोड्यासह दोन वेगवेगळे गुन्हे जामखेड पोलिी स्टेशनला दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, 5 जून रोजी दुपारी आरोपी नंदु प्रकाश गोरे (आपटी), नवनाथ वाल्मिक बोराटे (जवळके), सचिन दिगंबर चव्हाण (जामखेड) व एक अनोळखी इसम हे चार जण जामखेड करमाळ रोडवरील नंदादेवी पेट्रोल पंपावर स्कार्पिओ (एमएच 16 एटी 9589)या गाडीने आले व पेट्रोल पंपावर 3100 रूपयांचे डिझेल टाकले.या नंतर पेट्रोल पंपावरील कामगार शुभम सुरेश कोळपकर याने आरोपींना डिझेलचे पैसे मागितले असता आरोपींनी गाडीतील पिस्टलचा धाक दाखवून आम्ही पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते करून घे म्हणत स्कार्पिओ गाडी घेऊन जवळा गावाच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी डॉ. सुप्रभा बाबासाहेब कुमटकर, नान्नज यांच्या फिर्यादीवरून वरील चार जणांविरोधात आर्म अॅक्टसह दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसर्या घटनेत वरिल आरोपींनी याच दिवशी संध्याकाळी शहरातील तपनेश्वर भागातील सुपर ड्रायक्लीनच्या दुकानात येऊन फिर्यादी सुनीता पांडुरंग चव्हाण व तिचे पती पांडुरंग चव्हाण यांच्या मालकीच्या दुकानात पती पत्नी कपड्यांना इस्त्री करत असताना आरोपींनी लाकडी दांडक्याने तोंडावर पाठीवर जबर मारहाण केली. दुकानातील कपडे कागदपत्रे बाहेर फेकून दिले. तोडफोड करत 3500 रुपयांवर दरोडा घातला. याप्रकरणी सुनिता पांडूरंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गोरे हे करत आहेत.
























































