
मुंबई वाहतूक पोलिसांनी रविवारी मुंबईच्या चारही दिशांना ग्रीन कॉरिडॉर केले. ग्रीन कॉरिडॉर केल्याने लिव्हर, हृदय, किडनी हे अवयव वेळेत रुग्णालयात पोहचवले. वाहतूक पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
सकाळी महावीर जैन रुग्णालय ठाणे ते अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई हे 3 किलो मीटरचे अंतर अवघ्या चार मिनिटांत पार केले. त्याचप्रमाणे महावीर जैन रुग्णालय ठाणे ते रिलायन्स रुग्णालय गिरगाव हे 37 किलो मीटरचे अंतर अवघ्या 31 मिनिटांत पूर्ण केले. महावीर जैन रुग्णालयातून किडनी घेऊन रुग्णवाहिका 32 मिनिटांत नानावटी रुग्णालय विलेपार्ले येथे आली. त्यानंतर महावीर जैन रुग्णालयातून लिव्हर घेऊन रुग्णवाहिका केईएम रुग्णालयात 27 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 26 मिनिटांत करून आली.




























































