मॉब लिंचिंगप्रकरणी चार जणांना 7 वर्षांची शिक्षा

गाईंची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने राजस्थानमध्ये केलेल्या मॉब लिंचिंग प्रकरणातील चार आरोपींना अलवारच्या जिल्हा न्यायालयाने आज 7 वर्षांची शिक्षा सुनावली. जमावाने  2018 मध्ये गाईंच्या तस्करीवरून रकबार खान आणि त्याच्या सहकाऱयाला बेदम मारहाण केली होती. त्यात खान याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात 5 जणांना अटक करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. यातील चार जणांना आज 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, तर एकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.