रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलचे चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले असून 13 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.

विद्यार्थिनी नित्या फणसे ही राज्यात तिसरी, आदित्य दामले राज्यात सहावा, ललित डोळ राज्यात बारावा, मधुरा पाटील हिने राज्यात सोळावा क्रमांक पटकावला आहे. तसेच श्रावणी शेडेकर, सिद्धी भाटकर, स्वराज साळुंखे, आदिती शेलार, आश्लेषा काळे, अंतरा रायकर, मैत्री सूर्यवंशी, आर्ची नाटेकर आणि यज्ञा मयेकर यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱयांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, श्रीराम भावे, सुनील वणजू, नचिकेत जोशी उपमुख्याध्यापक पंगेरकर, पर्यवेक्षिका शिरोळकर, लवंदे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मराठीसाठी कौस्तुभ पालकर, प्रीती केळकर. गणितासाठी मीरा दामले, प्रतिभा बंडबे, प्रशांत वावरे. इंग्रजीसाठी प्रज्ञा डोंगरे. बुद्धिमत्तेसाठी श्रद्धा पिलणकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.