अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर भरधाव चारचाकी वाहनाची अनेक दुचाकींना धडक

अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. उलट दिशेने येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली आहे. पोलीसांच्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.