भ्रष्ट अधिकारी, बिल्डरांच्या ‘रिंग’मुळे 20 भिवंडीकरांचे बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शांतीनगर येथील मन्नत इमारत पत्त्यासारखी कोसळल्यानंतर भिवंडी शहरातील शेकडो धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डरांच्या ‘रिंग’मुळे गेल्या पाच वर्षांत 20 निष्पाप  भिवंडीकरांचे बळी गेले. तरीही पालिका प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या 239 अनधिकृत इमारती तत्काळ पाडण्याचे आदेश हायकोर्टाने देऊनही अद्याप या इमारतींवर हातोडा न मारल्याने हजारो नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.

आणखी किती जणांचे जीव घेणार?

अनधिकृत बांधकामांमुळे भकिष्यात कोणताही अनुचित प्रकार किंका दुर्घटना होऊन जीकित आणि कित्तहानी झाली तर  संबंधित प्रभाग अधिकाऱयाला जबाबदार धरण्यात येईल. तसेच  20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा करण्याचा इशारा आयुक्त अशोक रणखांब यांनी दिला होता, मात्र अधिकाऱयांना कारवाईचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. आता मन्नत कोसळून दोनजणांचा बळी गेल्यानंतर आणखी किती जणांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल सर्वसामान्य भिवंडीकर विचारत आहेत.

‘मन्नत’प्रकरणी बिल्डराला अटक

मन्नत इमारत दुर्घटनेप्रकरणी मुन्नवरअली अन्सारी या बिल्डरला अटक करण्यात आली आहे. शांतीनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी तीन दिवस पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

मृत्यूची टांगती तलवार

भिवंडी–निजामपूर पालिका क्षेत्रात  272 धोकादायक इमारती असून सुमारे 15 हजार रहिवाशांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. प्रभागनिहाय धोकादायक इमारती पुढीलप्रमाणे आहेत. प्रभाग समिती 1- 40, प्रभाग समिती 2- 152, प्रभाग समिती 3- 101, प्रभाग समिती 4- 278, प्रभगा समिती 5- 211.

 भिवंडी शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात पालिकेच्या उपायुक्त व प्रभाग अधिकाऱयांशी अर्थकारण करून नगरसेवकच अनधिकृत बांधकामांचे इमले रचत आहेत. 

 याबाबत येथील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर 239 इमारती तत्काळ पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशानंतर आयुक्त रणखांब यांनी तातडीची बैठक घेऊन अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली, मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. 

 प्रभाग अधिकारी व उपायुक्त दीपक कुरुळेकर यांच्या सहकार्याने पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. सध्या शहरात 400 पेक्षा जास्त अनधिकृत इमारती आहेत.